• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा

by Ganesh Dhanawade
August 30, 2021
in Old News
16 0
0
कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरसेविका मृणाल गोयथळे यांच्या कामकाजावर भाजप कार्यकर्ते नाराज

गुहागर :  गुहागर नगरपंचायत मधील प्रभाग क्र. १७ मधील भाजप नगरसेविका मृणाल राजेश गोयथळे या मनमानी कारभार करत असून आपल्या प्रभागाचा विकास करणे त्यांना शक्य नाही. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे या प्रभागामधील भाजप कार्यकर्ते नाराज असुन त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून उरली-सुरली भाजपही संपून जाईल, अशी भीती व्यक्त करत या प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्याकडे त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या मागणीवर भाजपचे वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ward no. 17 BJP workers in this ward are unhappy and the rest of the BJP will be exhausted due to their working methods.Expressing such fears, BJP workers in the ward demanded his immediate resignation in a statement to taluka president Nilesh Surve.

भाजप तालुकाध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनावर सिद्धार्थ वराडकर, ज्योती वराडकर, महेंद्र वराडकर, सनी तवसाळकर, मितेश वराडकर, श्रीरंग वराडकर, नेहा वराडकर, कुणाल वराडकर, अभिषेक भोसले, स्वप्नील पेंढारी, संभाजी वराडकर, दिगंबर वराडकर आदींसह अन्य भाजप कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर खालचापाट  प्रभाग क्र. १७ च्या नगरसेवीका सौ. मृणाल राजेश गोयथळे यांना आम्ही भाजपा कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेऊन नगरपंचायत निवडणुकीत निवडुण आणले आहे. मात्र, असे असताना या फक्त नावाला नगरसेविका असून आमच्या मनाला न पटणाऱ्या जनतेला न्याय देणाऱ्या आहेत. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात जाणे गरजेचे असताना त्या कधी पक्ष संघटनेसाठी बाहेर पडत नाहीत. चुकीच्या व्यक्तीमुळे पक्षाची हानी होत आहे. त्यामुळे याठिकाणी पक्षाची ताकद वाढविणे शक्य होत नाही. या उलट अशा नगरसेविकेमुळे पक्षातील सदस्य संख्या घटत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या नगरसेविकेचा तात्काळ राजिनामा घ्यावा. त्याच वेळी याठिकाणी आपला पुन्हा दुसरा उमेदवार निवडुन आणण्याची जबाबदारी आमची राहील याची खात्रीसुद्धा येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. सदरील निवेदन गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांना देण्यात आले आहे.

Tags: BJPBJP workersCorporatorGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarresignationstatementtaluka president Nilesh Surveगुहागर नगरपंचायतटॉप न्युजताज्या बातम्यातालुकाध्यक्ष निलेश सुर्वेनगरसेविकाभाजपभाजप कार्यकर्तेभाजपामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.