गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने कोकण विभागातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रा काढण्यात येणार आहे.
On behalf of Maharashtra Prantik Tailik Mahasabha General Assembly in three districts of Ratnagiri, Sindhudurg and Raigad in Konkan division President MP Ramdas Tadas, General Secretary Under the leadership of Dr.Bhushan Kardile Under the Samaj Jodo Abhiyan Rathyatra will be taken out.
शनिवार दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता खेर्डी तर ६.०० वाजता चिपळूण या ठिकाणी रथयात्रा येणार आहे. रविवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १ चिपळूण, दुपारी ३.०० वाजता संगमेश्वर-देवरुख (नांदळज), संध्याकाळी ५.०० वाजता रत्नागिरी, १३ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता पावस, ११ ते २ आडीवरे, दुपारी ३ ते संध्याकाळी ७ जामसंडे तळेबाजार, कुणकेश्वर सिंधुदुर्ग या ठिकाणी मुक्काम तर १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता कणकवली आजरा असा रथयात्रेचा मार्ग असणार आहे. कोकण विभागातील तिन्ही जिल्ह्यात असणाऱ्या तेली समाज बांधवांना या रथयात्रेच्या माध्यमातून संघटित करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी, कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, सरचिटणीस चंद्रकांत झगडे, रघुवीर शेलार, एकनाथ तेली, अनिल लांजेकर, बापू राऊत,संतोष रहाटे, अशोक तेली,विजय शेट्टी, लक्ष्मण तेली, विनोद झगडे, गजानन महाडिक आदी प्रयत्न करीत आहेत.