गुहागर : कोरोना महामारीमुळे शालेय शिक्षण(School education) ऑनलाइन(Online) पद्धतीने चालू आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी शिक्षकांनीहि पालकांशी संवाद साधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे(Guhagar Education Society) सीईओ(CEO) व स्कूल कमिटी(School committee) अध्यक्ष दीपक कनगुटकर यांनी केले.
येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर(Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidyamandir) शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत(Scholarship Exam) गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा(Quality students) सत्कार समारंभ रंगमंदिर(Rangmandir) येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुहागर तालुक्यातील पहिली व गुणवत्ता यादीत जिल्ह्यात तिसरी आलेली आर्या मंदार गोयथळे, शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी(Urban General Quality List) मधून इयत्ता आठवी मधून कनिष्का समीर बावधनकर जिल्ह्यात ३७ वी, इयत्ता पाचवी मधून जिल्ह्यात 36 वा विवेक राजेंद्र बाणे, पाचवी शहरी सर्वसाधारण मधून रेईश वीरेंद्र चौगुले जिल्ह्यात 47 वी आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पाचवी मधून सानवी संकेत गोयथळे, अनुष्का पंकज देवकर, प्रणव दत्तात्रय मेटकरी हे उत्तीर्ण झाले म्हणून त्यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आठवी मधून हर्षदा शाम नाटेकर व प्रज्ञा संदेश घाणेकर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सोनाली घाडे, शिक्षक उत्कर्षा तांबट – कांबळे, संतोष मोहिते, अविनाश गमरे, मधुकर गंगावणे, स्वप्नील कांबळे, अमोल कातकर, कृपाल परचुरे, विलास साबळे, देविदास नाईक, सुजाता कांबळे, ज्योती माने, सोनाली हळदणकर आदी उपस्थित होते.