शिवबांचे वीर उपविजेता
गुहागर : तालुक्यातील तळवली येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तळवली प्रीमियर लीग (Talwali Premier League) 2022 पहिल्या पर्वाचा स्वयंभू सोमनागेश्वर संघ(Swayambhu Somnageshwar Sangh) विजेता ठरला तर शिवबांचे वीर संघाने(Shivba’s Veer Sangh) उपविजेते पद पटकाविले.
या स्पर्धेचे उदघाटन गावातील जेष्ठ क्रिकेटपटू(Cricketers) भिकाजी कुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल, ग्रा.पं. सदस्य सचिन कलंबाटे, संतोष जोशी, सविता शिंदे, सुहासिनी जाधव, सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे,संतोष आग्रे, टीपीएल कमिटी अध्यक्ष प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.


या स्पर्धेत एकूण 12 संघमालकानी(Team owner) आपले संघ खेळवले. सर्वच संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील खेळाडूंना एकत्र व्यासपीठावर आणण्याचे काम झाले. यामध्ये अंतिम फेरीत शिवबांचे वीर व स्वयंभू सोमनागेश्वर या दोन संघामध्ये लढत झाली. यामध्ये स्वयंभू सोमनागेश्वर संघाने स्पर्धेचे विजेतेपद तर शिवबांचे वीर संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला रोख रक्कम 10 हजार व आकर्षक चषक तसेच उपविजेता संघाला रोख रक्कम 7 हजार व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सरपंच मयुरी शिगवण यांनी तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्री सुकाईदेवी तरुण हौशी मंडळ(Shri Sukai Devi Young Amateur Circle) आगरवाडी न. 1 यांनी पुरस्कृत केले होते. स्पर्धेत मालिकावीर(Series hero) म्हणून अभिषेक डावल, उत्कृष्ठ फलंदाज(Excellent batsman) आशिष आग्रे, उत्कृष्ट गोलंदाज (Excellent bowler) ऋषी डावल यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून विनोद पवार, संतोष पवार,सुदिप जाधव, निशांत जाधव, वैभव कळंबाटे, समीर पवार, प्रदीप चव्हाण यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे समालोचन नरेश पवार, अथर्व पवार, ओंकार पिंपरकर, विशाल डावल यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर कांबळे व प्रा. अमोल जडयाळ यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी टीपीएलच्या(TPL) सर्व सदस्यांनी व डावलवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.