गुहागर : जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित भिंती सुशोभन स्पर्धेत गुहागर तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या प्रशालेचे कलाशिक्षक स्वरुपकुमार काशिनाथ केळस्कर यांनी जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
On behalf of Zilla Parishad Ratnagiri’s Water and Sanitation Mission Chandrakant Bait Madhyamik Vidyalaya Abloli in Guhagar taluka in the wall decoration competition organized on the occasion of Independence Day Amrit Mahotsav Swaroop Kumar Kashinath Kelaskar, the art teacher of this school It is ranked second at the district level.


भिंती सुशोभन स्पर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर घेऊन त्यातील पहिल्या दोन कलाकृती जिल्हा स्तरावर पाठविण्यात आल्या होत्या. तालुका स्तरावर स्वरूप कुमार केळस्कर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला होता. आपल्या चित्रातून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा रेखाटला होता. जिल्ह्यातील नमन परंपरा, जाखडी, शिमगोत्सव आदी बाबी रेखाटल्या आहेत. त्यांच्या कलाकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल लोकशिक्षण मंडळ आबलोली चे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, सचिव राकेश साळवी, संचालक अविनाश कदम, सुषमा उकार्डे, मुख्याध्यापक डी.डी.गीरी यांसह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.



