ज्ञानरश्मि वाचनालय आयोजित
गुहागर : शहरातील ज्ञानरश्मि तालुका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्यता सप्ताह निमित्त डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात कोरोनाचे नियम पाळुन आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात स्वराजराजे बाबासाहेब राशिनकर याने तर उच्च प्राथमिक गटात ओम दिपक देवकर याने प्रथम क्रमांक पटकावून सुयश संपादीत केले.
On the occasion of Independence Week, In the oratory competition held at Dr.Tanajirao Chorge Hall following the rules of corona, SwarajRaje Babasaheb Rashinkar bagged the first place in the primary group and Om Deepak Deokar bagged the first place in the upper primary group.
प्राथमिक गटात ह्रदयेश प्रशांत साटले हा द्वितीय व अरणी राधेश्याम घाडे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तर उच्च प्राथमिक गटात भाग्यश्री दिलीप नाटुस्कर ही व्दितीय व साई प्रफुल्ल वायंगणकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. सदर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विवेकानंद जोशी यांनी केले. माझा आवडता नेता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन ॲड. मंगेश जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले व ज्ञानरश्मि वाचनालयाचे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, कै.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर, कोकण पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष गौरव पाटकर , सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, मसापचे उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर मसापचे कार्यवाह ईश्वर हलगरे, यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. ज्ञानरश्मि वाचनालयाचे व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छाही उपस्थितांच्या वतीने देण्यात आल्या. स्पर्धा यशस्वीतेसाठी मसाप कार्याध्यक्षा प्रा.मनाली बावधनकर वाचनालयाच्या ग्रंथपाल सोनाली घाडे, शामली घाडे, अश्विनी जोशी यांनी मेहनत घेतली त्यावेळी दिपक देवकर, प्रशांत साटले इतर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर व पालकांनी समाधान व्यक्त केले.