गुहागर : तालुक्यातील तळवली येथे नुकताच भात कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी येथील शेतकरी दत्तात्रय किंजळे यांच्या शेतावर हा भात कापणी, मळणी प्रयोग घेण्यात आला. तहसीलदार प्रतिभा वराळे, मंडळ अधिकारी श्री साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.
A rice harvesting experiment was recently conducted at Talwali. At this time, this paddy harvesting and threshing experiment was carried out on the farm of farmer Dattatraya Kinjale. The crop harvesting experiment was conducted in the presence of Tehsildar Pratibha Warale, Board Officer Mr. Salunkhe.
गुहागर तालुक्यातील प्रत्येक मंडळ विभागात हा पीक कापणी प्रयोग घेतला जात आहे. काही ठिकाणी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी प्रत्येक विविध मंडळामध्ये जाऊन हा प्रयोग शेतकरी वर्गाला सोबत घेत करत आहेत. यामध्ये पीक कापणी, मळणी व त्या पिकातून मिळालेल्या उत्पन्नाचे मोजमाप करून तालुक्यातील एकूण पिकाची सरासरी काढली जाते.
यावेळी तळवली येथे पार पडलेल्या या पीक कापणी प्रयोगावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, तळवली सरपंच मयुरी शिगवण,तळवली मंडळ अधिकारी श्री साळुंखे, कृषी पर्यवेक्षक पी.एम. गवारी, कृषी सेवक ए. एस. शेळके, के. डी. देमुंडे, गुहागर तालुका विमा प्रतिनिधी प्रशितोष कदम, तलाठी श्री.भिसे, आशिष कारेकर, पोलीस पाटील विनोद पवार, कोतवाल सुरज गिजे, शेतकरी दत्तात्रय किंजळे, लक्ष्मी किंजळे, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ कारेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.