गुहागर : राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रामाणिकपणे नोकरी करत आपल्या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करणारे गुहागर तालुक्यातील गिमवी येथील सुभाष जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर शेळीपालनाबरोबरच शेतीमध्ये विविध प्रयोग करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करून दिला आहे. गावातील मातीतून सोनं पिकवू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
Subhash Jadhav from Gimvi in Guhagar taluka, who is honestly working in the state excise department and trying to do justice to his position, has set an created an ideal by doing various experiments in agriculture along with goat rearing after retirement.
गिमवीचे सुपुत्र सुभाष जाधव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी करत असताना या विभागात आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला होता. गोवा बनावटीच्या दारूसह बेकायदा दारूची तस्करी त्यांनी रोखली होती. यावेळी सुभाष जाधव यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र, ते डगमगले नाहीत. त्या संकटांना परतावून लावत आपले कर्तृत्व वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागात सिद्ध करून दाखवले होते. यामुळे या विभागात त्यांची एक वेगळी ओळख होती. इतकेच नव्हे तर अवैध दारूधंदेवाल्यामध्ये जरब निर्माण केली होती. नोकरी करीत असताना सेवानिवृत्तीनंतर काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता. यादृष्टीने त्या वेळीच नियोजन केले होते. त्यांनी मनात ठरवले होते की, सेवानिवृत्तीनंतर शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
सुभाष जाधव त्यांचा मुलगा रोहित यांनी ठाणे येथे शेळी पालन प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी गिमवी येथे शेळीपालनासाठी शेड उभारणी तसेच शेळ्यांना चारा कमी पडू नये, या करता देखील नियोजन केले. गावरान शेळी, कोकण कन्याळ या जातीचे ४० बकरी व बोकड घेऊन व्यवसाय सुरू केला. अधुन मधून बकऱ्यांची विक्री करून आर्थिक उत्पन्न मिळविले तर आता १३० च्या लहान मोठे बकरी व बोकड आहेत.
खरं म्हणजे सुभाष जाधव यांचा बंदिस्त उस्मानाबादी जातीचे व इतर उच्च जातीचे बोकड पालन करण्याचा मानस होता. मात्र, करून कोरोना परिस्थितीमुळे ते साध्य होऊ शकले नाही. तरी कोकण कन्याळ या जातीच्या बोकडांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शेळी व बोकडाच्या लेंध्याच्या आधारे शेणखत तयार करून या माध्यमातून शेतीसाठी उपयोग होऊ शकतो, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. शेळीपालन व्यवसाय बरोबरच सुभाष जाधव यांनी देखील काही एकरात भात शेती केली आहे. यावर्षी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या शेतावर आणून 1 जुलै रोजी चारसूत्री लागवड करून कृषी दिन साजरा केला होता. याबाबत श्री. जाधव यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. मध्यंतरीच्या काळात आपल्या परिसरातील सुशिक्षित तरुणांना पोलिस लष्करमध्ये भरती व्हावी, यासाठी मार्गदर्शन शिबीर देखील घेतले होते. याबद्दल पंचक्रोशीतील तरुणांनी सुभाष जाधव यांना धन्यवाद दिले आहेत.