Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला उत्तंगता देणारे, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील शिक्षण क्षेत्रासाठी झटणारे, आदर्श प्राचार्य, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभाविपचे मार्गदर्शक, सुभाष देव यांचे मंगळवारी 11 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले . प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर देवसर शैक्षणिक अनुसंधान कार्य (NCERT) आणि नॅक (NAAC) या दोन संस्थांमध्ये कार्यरत होते. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo


कर्तृत्ववान प्राचार्य
अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणारे देव सर यांनी सुरुवातीला काही काळ ग्रंथालयात रेफरी म्हणून सेवा केली. अध्यापकीय काळात त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य असताना त्यांनी राबविलेल्या अनेक योजना आणि विद्यार्थीभिमुखता यामुळे महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलून गेला. कोंकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘कोकण टॅलेंट सर्च’ (Konkan Talent Search exam.) या चळवळीत देवसरांनी महत्त्वाची भूमिका निभावली. महाविद्यालयात विज्ञान मंच सारख्या योजना राबवून त्यांनी जिल्ह्यातील बुद्धिमान आणि होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची अधिकाधिक ओळख होण्यासाठी प्रयत्न केले . गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत विविध नामवंत संशोधन संस्थांच्या साहाय्याने उत्तमोत्तम प्रयोगसाहित्य आणि उपकरणे मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. महाविद्यालयात लोकसेवा आयोगाच्या (MPSC, UPSC) परीक्षांच्या मार्गदर्शनाचे वर्गही त्यांनी सुरू केले होते. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) हे त्यांच्या आवडीचे एक क्षेत्र होते. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई विद्यापीठाची एनएसएसची दोन महाशिबिरे महाविद्यालयात झाली होती . विविध विषयांवरील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय परिसंवाद व चर्चासत्रे यांचे आयोजन महाविद्यालयातर्फे केले. ग्रंथालयातील नोकरीमध्ये करताना मिळालेला अनुभव आणि ग्रंथालय (Library) विकासाच्या मनातील कल्पना देवसर यांनी प्राचार्य पदाच्या कारकिर्दीत प्रत्यक्षात आणल्या. त्यातूनच महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयाचा विकास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण आणि इमारतींचा विस्तार यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयास अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्रातील क्रमांक 1 चे महाविद्यालय अशी ओळख निर्माण झाली. महाविद्यालयाला एका उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo


नॅक मानांकनासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शन
प्राचार्य डॉ. देव यांच्या प्रयत्नांमुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला कोकणातील पहिले नॅक मानांकन (NAAC) मिळाले. देवसरांनी केवळ त्यावर समाधान मानले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक वरिष्ठ महाविद्यालयाला नॅकचे मानांकन मिळावे यासाठी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांच्या एकत्रित बैठका घेतल्या. अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या. संस्थेच्या, महाविद्यालयाच्या मर्यादा सांभाळून आपण कोणते प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन केले. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo
मुंबई विद्यापीठात योगदान
प्राचार्य पदावर असताना आणि निवृत्ती झाल्यानंतरही देवसर शिक्षण क्षेत्रात कार्यमग्न होते. मुंबई विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. विशेष म्हणजे परीक्षा विभागाचे संचालक म्हणून दोन वर्ष काम करण्याची संधी त्यांना मिळाली. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo


सामाजिक क्षेत्रातही सक्रीय
शिक्षण क्षेत्राबरोबरच देवसर सामाजिक क्षेत्रातही काम करत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रत्नागिरी शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे राहीले. ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, ब्रीज असोसिएशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष, माउंटेनिअरिंग क्लब, पॉवरलिफ्टिंग आदी संघटनांमध्येही ते पदाधिकारी होते. निवृत्तीनंतर शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या नवीन महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, आर्थिक साह्य केले. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo
कोकण बोर्डाच्या स्थापनेत योगदान
कोकण विभागीय मंडळ व्हावे ही अरुअप्पांची व डॉ. देव यांची अनेक वर्षांची इच्छा होती. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालू केले होते. त्यासाठी अरुअप्पांसोबत राजकीय नेतेमंडळी व तीनही जिल्ह्यांतील संस्थाचालक, मुख्याध्यापक यांची मोट त्यांनी बांधली. सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी, नेते आदींच्या भेटी घेतल्या. या प्रयत्नांना यश आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्वतंत्र कोकण बोर्डची घोषणा केली. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo


डॉ. विनय नातूंचा केला होता प्रचार
गुहागरचे लोकप्रिय आमदार कै. तात्या नातूंच्या निधनानंतर गुहागरमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपने डॉ. विनय नातूंना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक आमदार, नेते, कार्यकर्ते गुहागरमध्ये आले होते. त्यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापक असलेले सुभाष देव सर देखील गुहागरमध्ये चार दिवस डॉ. विनय नातूंच्या प्रचारासाठी राहीले होते. गुहागर, अंजनवेल, वेलदूर, पवारसाखरी, पालपेणे, तळवली या भागातील कार्यकर्त्यांच्या भेटी देव सर यांनी घेतल्या. प्रचाराचे साहित्य वाटले होते. Ideal Principal, Educationist, Mentor, Subhash Deo