दीपक कनगुटकर यांचे प्रतिपादन
गुहागर : आजच्या आधुनिक जगातील स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल युगातील(The digital age) तंत्रज्ञानाची ओळख होणे फार गरजेचे आहे. या डिजिटल क्लासरूममुळे(Digital classroom) विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखीनच भर पडणार आहे. या शैक्षणिक कार्यात मर्दा कुटुंबीयांनी दिलेले योगदान(Contribution) कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या(Shree Dev Gopal Krishna Secondary School) शालेय व्यवस्थापन समितीचे(School Management Committee) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कनगुटकर यांनी केले.


गुहागर हायस्कूलच्या(Guhagar High School) डिजिटल क्लास रूमसाठी कै. चतुर्भुज मर्दा यांच्या स्मरणार्थ इचलकरंजी येथील उद्योजक(Entrepreneur) राजेश चतुर्भुज मर्दा यांच्याकडून लॅपटॉप, प्रोजेक्टर स्क्रीन व स्पीकरची भेट देण्यात आली. या डिजीटल रूमचा शुभारंभ गुहागर हायस्कूलच्या शालेय समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(Chief Executive Officer) दीपक कनगुटकर यांच्या हस्ते फीत कापून व श्रीकिसन मर्दा, सुरेंद्र मर्दा यांच्या हस्ते रिमोट दाबून प्रोजेक्टरचे अनावरण(Unveiling) करण्यात आले. यावेळी श्री कॉम्पुटरचे संतोष मोरे यांनी तयार केलेले शाळेचे माहितीपट चित्रण(Documentary illustration) दाखविण्यात आले. त्यानंतर रंगमंदिर(Rangmandir) येथे छोटेखाणी कार्यक्रम पार पडला. मर्दा कुटुंबीयांनी शाळेच्या डिजिटल क्लासरूम साठी साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्यावतीने श्रीकिसन मर्दा, सुरेंद्र मर्दा, अभिजित मर्दा,प्रतीक मर्दा यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.


श्री. कनगुटकर पुढे म्हणाले, ‘‘डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणखी भर पडणार आहे. डिजिटल क्लासमुळे सर्व चित्ररूपी माहिती मिळून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. आधुनिक काळानुसार ज्ञानरूपी प्रगतीच्या वाटेने सर्व विद्यार्थी घडणार आहेत. हे डिजिटल साहित्य भेट देणारे मर्दा कुटुंबीय यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी आपल्या प्रस्ताविकेत समाजातील दानशूर व्यक्तीमुळेच शाळेच्या गरजा पूर्ण करणे शक्य होते. आजच्या आधुनिक काळात आपल्या शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत. आज प्रत्येक क्षेत्रात या शाळेतील विद्यार्थी आपल्या कार्याचा ठसा उमटवितांना दिसत आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे, असे गौरवोद्गार आडेकर यांनी काढले.


या कार्यक्रमाला गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव संदीप भोसले, संचालिका ज्योती परचुरे, पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक देवकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पर्यवेक्षक कोरके, पर्यवेक्षक सोनाली हळदणकर, शिक्षक राधा शिंदे, कृपाल परचूरे, महेश दिक्षीत, मधुकर गंगावणे, उदय रावणंग, व्ही. टि. जाधव, स्वप्निल कांबळे, संतोष मोहीते, नवरंग पाटिल,मनीषा सावंत, ज्योती देवकर, गायत्री कनगुटकर, मीना खानविलकर, स्वामिनी भोसले, उत्कर्षा कांबळे, ज्योती माने, अमोल कतकर, श्री. साबळे, अविनाश गमरे, पी. बी. जाधव, कमळाकर पवार, रवींद्र मालप, दिपक गुरव, शशिकांत वराडकर, संतोष कदम, श्री. खामकर, श्री. मेटकरी, श्री. खोत, श्री. देशपांडे, निलेश गोयथळे, ठाकूर मॅडम आदी उपस्थित होते.