गुहागरात बंदला समिश्र प्रतिसाद
गुहागर : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या अंत्यत अमानुष घटनेबद्दल केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आला होता. गुहागर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी गुहागर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत तहसीलदार प्रतिभा वराळे याना निवेदन देण्यात आले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बंदला तालुक्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. गुहागर शहरातील बहुतांशी दुकाने उघडी होती.
Maharashtra Bandh was called to protest the BJP government at the Center. A statement was issued to Tehsildar Pratibha Varale by all the leading office bearers of Shiv Sena, NCP, National Indira Congress in Guhagar taluka urging all traders in Guhagar city to participate in Maharashtra Bandh.
महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून आपले म्हणणे सरकार पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू वेळोवेळी हे आंदोलन भाजपा सरकारतर्फे दाबण्याचा, भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याला यश आले नाही. शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीव्दारे शेजाऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा सरकारतर्फे चालविला आहे. लखीमपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशातील बळीराजा देशोधडीला लागला आहे. सतत अन्याय आणि पिळवणुकीने त्याचं जगणं मुश्किल झालं आहे. कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. तर दुसरीकडे लखीमपूरमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात येते. हा प्रकार देशातील शेतकऱ्याला जाणीवपूर्वक उध्वस्त करणारा आहे. त्याचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
यावेळी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रियाज ठाकुर, शिवसेना गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, गुहागर नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, प्रदीप बेंडल, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अजित बेलवलकर, गौरव वेल्हाळ, युवा सेना तालुकाध्यक्ष अमरदीप परचुरे, गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष स्नेहा भागडे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, नगरसेविका सुजाता बागकर, राष्ट्रवादी गुहागर शहर अध्यक्ष मंदार कचरेकर, श्रीधर बागकर, प्रसाद विचारे, काँग्रेस सरचिटणीस विजय विचारे, दिलीप नार्वेकर आदी उपस्थित होते.