लवकरच जेलभरो आंदोलन करणार – सुरेश सावंत
गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीय विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा. या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कोविडचे सर्व नियम पाळून सर्व तहसील कार्यालयात निवेदन देवून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांनी दिली.
The Mahavikas Aghadi government has become an anti-backward class government. The decision to give reservation in promotion to backward classes should be taken by the state government immediately. Republican Party of India District President Suresh Sawant informed that a agitation will be organized in front of the District Collector’s Office soon by submitting a statement in all the tehsil offices following the rules of Covid from every taluka of Ratnagiri district.
सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचे निर्देश राज्य शासनाना दिले आहेत. पदोन्नती मध्ये आरक्षण हा सर्व मागासवर्गीयांचा हक्क आहे. त्यामुळे पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य शासनाने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तर्फे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात जावून शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्याकरिता येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले