गुहागर : तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत अशी मागणी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे.
Guhagar taluka Maharashtra Navnirman Sena president Vinod Janwalkar has demanded in a statement that all Maha-e-Seva Kendras and Setu offices in the taluka should be started immediately.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या गुहागर तालुक्यात महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांपुढें मोठी अडचण निर्माण झाली आहे, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना जातीचा, उत्पन्नाचा व इतर तत्सम दाखले महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय बंद असल्यामुळे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे, शासनाकडून कोरोनाचे निर्बंध थोड्याफार प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. शासनाच्या कोरोना संदर्भातील नियम व अटीचे पालन करून महा ई सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी माजी अध्यक्ष राजेश शेटे, तालुका महिला विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर, स्वप्नील कांबळे,दिनेश निवाते, नितिन कारकर, कौस्तुभ कोपरकर, रुतिक गावणकर, मयुर शिगवण आदी उपस्थित होते.