• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काजुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by Ganesh Dhanawade
October 5, 2021
in Old News
17 0
0
काजुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी व निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली (ता.गुहागर) यांच्यावतीने डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास काजुर्ली परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेत्र तपासणी साठी डॉ.किशोर सूर्यवंशी,तात्यासाहेब सावंत हे उपस्थित होते.
On behalf of Diwaliben Mohanlal Mehta Lions Eye Hospital Ratnagiri and Nirmal Gram Panchayat Kajurli, Citizens of Kajurli area responded spontaneously to the free eye check-up camp at Nanasaheb Mayekar Secondary School. Dr. Kishore Suryavanshi and Tatyasaheb Sawant were present for eye examination.

शिबिराच्या आयोजनासाठी विजय कदम, सुधाकर गोणबरे, कैलास साळवी यांनी प्रयत्न केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच रुक्मिणी सुवरे,उपसरपंच सुधाकर गोणबरे,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे,अजित मोहिते,सखी सावंत, स्नेहल गुरव, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र जोशी,कैलास साळवी,विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामपंचायत काजुर्ली व डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक अमोल पवार यांनी स्वागत केले. शिबिरामध्ये रुग्णांची नेत्रतपासणी करून गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिराचा काजुर्ली परिसरातील सुमारे १५० नागरिकांनी लाभ घेतला.शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचे उपसरपंच सुधाकर गोणबरे यांनी आभार मानले.

Tags: areaDiwaliben Mohanlal Mehta Lions Eye HospitalDr. Nanasaheb Mayekar Madhyamik Vidyalayeye check-up campGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarspontaneouslyटॉप न्युजडॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्लीतंटामुक्त समितीताज्या बातम्यादिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटलनिर्मल ग्रामपंचायत काजुर्लीनेत्र तपासणी शिबिरमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.