• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अनाथांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहिम

by Ganesh Dhanawade
December 23, 2021
in Ratnagiri
17 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी :- शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 23 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार अनाथांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरीत करणेबाबत मार्गदर्शक सूचना देणेत आलेल्या आहेत. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 16 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये राज्यातील जास्तीत जास्त अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण व्हावे याकरिता 31 डिसेंबर 2021 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यांत येत आहे व त्यामध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी/तपासणी करुन अनाथांना उचित शिधापत्रिका वितरीत करण्यात येणार आहेत. संबंधितांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.

१) अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरीत करून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभ देण्यांत यावा. २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे अनुज्ञेय शिधापत्रिका च त्यावरील लाभ देण्यांत येतील.

२) संस्थेमध्ये असलेल्या अनाथांना कल्याणकारी संस्था व वसतीगृहे योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यांत येतो. त्यामुळे सदर लाभ हे संस्थेमध्ये असणाऱ्या अनाथांना अनुज्ञेय असणार नाहीत.

३) अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरीत केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात यावा.

(४) ओळखपत्र म्हणून आधारकार्ड/बँक पासबुक/ बालगृह, निरीक्षणगृह अनुरक्षणगृह इ. संस्थांच्या बाबतीत त्या संस्थेच्या अधिक्षकांचे संस्थेत वास्तव्य केल्याबाबतचे प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे.

५) रहिवासासंदर्भात शहरी भगात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच / उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र ग्राहय धरले जाईल.

६) बहुतांशी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अनाथांकडून वयाच्या २८ वर्षांपर्यंत उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र घेण्यांत येईल.

Tags: advantageAppropriate ration cardsDistrict Supply OfficerGuhagarGuhagar NewsinspectionMarathi NewsNews in Guhagarspecial campaignverificationअनाथअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाजिल्हा पुरवठा अधिकारीटॉप न्युजताज्या बातम्याबीपीएलमंत्रालयमराठी बातम्यालोकल न्युजशिधापत्रिकाशिधापत्रिका वितरण
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.