• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा

by Ganesh Dhanawade
June 16, 2021
in Old News
16 0
0
मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईकरांना आता लोकलमध्ये विनाअडथळा करमणुकीची सुविधा मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’अंर्तगत रेल्वेच्या डब्यात ‘मीडिया सव्‍‌र्हर’ बसविला जाणार असून मोबाइलवर विनाअडथळा करमणुकीचा आनंद लुटता येईल. ही सुविधा जुलै २०२१ अखेर पासून लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यातून मध्य रेल्वेला वर्षांला १ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे.
करोना काळात निर्बंध आल्यानंतर प्रवासी कमी झाले असले तरीही आजही अनेकांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र आता या प्रवासात ठरावीक कार्यक्रम, चित्रपट, काही वाहिन्यांवरील कार्यक्रम प्रवाशांना मोबाइलवर विनाअडथळा आणि इंटरनेट न वापरता पाहता येतील. पुढील महिन्यापासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे. रेल्वेकडून याचे एका खासगी कं पनीला याचे काम देण्यात आले असून त्याची कुर्ला कारशेडमध्ये चाचणीही करण्यात आली आहे.

होणार काय?

सध्या १६५ लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात असून यातील १० लोकलमध्ये करममुकीसाठी लागणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. अन्य लोकलमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. याकरिता एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येत असून ते प्रवाशांना डाउनलोड करावे लागेल. लोकलमध्ये प्रवेश के ल्यानंतर या सेवेच्या कक्षेत येताच त्याद्वारे प्रवासी विना इंटरनेट विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील. अ‍ॅपच्या माध्यमातून आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने यासह अनेक करमणुकीच्या सुविधा मिळतील.

पश्चिम रेल्वेमध्येही उपलब्ध..

मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील चेन्नई एक्स्प्रेसमध्ये ती सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेवरही  सुविधा सुरू केली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची धार्मिक, राजकिय आणि अश्लिल माहितीवर बंदी असेल. गरज नसेल तेव्हा प्रवासी उपलब्ध मोबाइल अ‍ॅप बंद करू शकतील.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामध्य रेल्वेमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.