धोपावे गावात शासनासह ग्रामस्थांचे प्रयत्न असफल,
गुहागर, ता. 01 : धोपावे गावाचा पाणी प्रश्र्न गेल्या 35 वर्षात इतका तीव्र बनला आहे की त्याने गावात आर्थिक, सामाजिक समस्या Socioeconomic problems in Dhopave निर्माण झाल्या आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी 1995 पासून 2022 पर्यंत शासनाने आणि गावाने अनेक प्रयत्न केले. सुमारे 20 वेगवेगळ्या योजनांसाठी लाखो रुपयांचा खर्च झाले. तात्कालिक यशही मिळाले. पण पाणी टंचाई कायम राहीली.
1965 मध्ये धोपावेमध्ये गावात धरण बांधण्यात आले होते. या धरणात पाणी यावे म्हणून गोठण व पेरुपाणी येथे 1993 ला बंधारे बांधले. जलवाहिन्यां दुरुस्त केल्या. 2005 मध्ये जलस्वराज्य योजनेतून Jalaswarajya Yojana धरणाची गळती थांबवणे, पूर्व आणि पश्चिम भागातील जलवाहिन्या दुरुस्त करणे आदी कामे झाली. 2009 मध्ये आणखी एक साठवण टाकी बांधील. 2013 मध्ये गोठण येथे विहीर, 2016-17 मध्ये जलयुक्त शिवारमधुन 3 बंधारे आदी कामे झाली. (Socioeconomic problems in Dhopave)
शासकीय योजनांप्रमाणेच वाडी वस्तीमधुनही पाणी समस्येवर प्रयत्न सुरु होते. The efforts of villagers & government failed सावंतवाडीतील ग्रामस्थांनी वाडीपुरती एक योजना केली. या योजनेतून त्या वाडीला आज पुरेसे पाणी मिळत आहे. हनुमानवाडीनेही श्रमदानातून 25 फुट खोल विहीर बांधली. मे महिन्यात या विहिरीतून प्रती दिवस 3 हजार लिटर पाणी मिळत आहे. तेलीवाडी, तेटलेवाडी, कोलगेवाडी या ठिकाणी वैयक्तिक बोअरवेल Borewell खोदल्या. गावातील तरुणांनी श्रमदानातून ब्राह्मणवाडी आणि हनुमानवाडीच्या डोंगरावर शेततळी बांधली. या प्रयत्नातून काही वाड्यांचा प्रश्र्न तात्पुरता मिटला. पण पाण्याची समस्या कायम राहीली. (Socioeconomic problems in Dhopave)
गेली 10 वर्ष कालिकादेवी जनजागृती मंडळातर्फे एप्रिल ते मे अखेरपर्यंत टँकरने पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. हा खर्च गावासह, तालुक्यातील दानशुर व्यक्तींकडून निधी स्वरुपात गोळा केला जातो. पण दरवर्षी केवळ दोन महिन्यांसाठी लाख, दिड लाख रुपये खर्चुन एक दिवसाआडच पाण्याचे नियोजन होते.
Socioeconomic problems in Dhopave
जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठीच्या संघर्षाने (water scarcity) धोपावेमध्ये सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण झाला. उन्हाळ्यात आरोग्य (Health) उत्तम रहाण्यासाठी रोजचे स्नान आवश्यक. पण त्यासाठी पाणी पुरत नाही. नाईलाज म्हणून महिला, पुरुष, मुले, मुली खाडीतील पाण्याने आंघोळ करतात. त्याचा त्वचेवर परिणाम होतो. ज्यांना हे शक्य नाही त्यांची मोठी अडचण. मग टंचाईच्या काळात नातेवाईकांकडे जायचे. त्यातून दैनंदिन व्यवहार थांबतात.
पाणी टंचाईमुळे (water scarcity) येथील तरुणांचे विवाह थांबले. बाहेरगावातून मुलगी देण्यास पालक तयार होत नाहीत. गावातील मुलींची लग्न टंचाईच्या काळात ठरली तर यजमानांना पाण्यासाठी लाख, दिडलाखाचा स्वतंत्र खर्च करावा लागतो. या खर्चातून पुढची समस्या तयार होते ती कर्जबाजारी होण्याची. त्यातून व्यसनाधिनता वाढते. या समस्या उग्र बनल्याने गृह कलह आणि सामाजिक ताण तणाव, (Social Problems) होतात. अशा पध्दतीने एका (water scarcity) समस्येतून दुसरी समस्या असे दुष्टचक्र सुरु होते. (Socioeconomic problems in Dhopave)
पाणी समस्येतून आर्थिक चक्र बिघडते. सर्वाधिक पाणीटंचाईची (water scarcity) छळ मच्छीमार वस्तीसह 6 वाड्यांना सोसावी लागते. येथील अनेक महिला दाभोळवरुन फेरीबोटीने दररोज पाणी भरुन आणतात. त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो. येथील बहुतांश पुरुष मंडळी मासेमारीसाठी समुद्रात जातात. तर या समाजातील महिला मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात. पाणी टंचाईचा परिणाम यांच्या वेळापत्रकावर होतो. टँकर येईल त्यादिवशी पाणी भरुन ठेवण्यासाठी नाईलाजाने व्यवसायाला, मासेमारीला सुट्टी द्यावी लागते. जवळपास एक महिन्याचा व्यवसाय बुडत असल्याने आर्थिक गणित बिघडते. मच्छीमारीशिवाय रोजंदारीवर कामाला जाणाऱ्यांनाही याच समस्येला तोंड द्यावे लागते. दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसानीचा परिणाम जीवनावर होतोच. (Socioeconomic problems in Dhopave)
पाणी टंचाईच्या (water scarcity) संघर्षामुळे आज गावात राजकीय संघर्षही उभा राहीला आहे. या अदृष्य संघर्षाचे परिणाम गावाच्या सामाजिक जीवनावर होत आहेत. गावात गटतटाचे राजकारण, वाड्यावाड्यांमध्ये, माणसांमध्ये निर्माण झालेला दुरावा, कटुता याने गावाचे वातावरण बिघडले आहे. (Socioeconomic problems in Dhopave) एका समस्येमुळे गावाचा सर्वांगिण विकासाला खीळ बसली आहे. म्हणूनच पाणी टंचाईची समस्येचे कायमस्वरुपी निराकरण होणे आवश्यक आहे.