सैनिक कल्याण आणि कॅन्सरवरील संशोधनासाठी दिली देणगी
गुहागर, ता. 30 : पाटपन्हाळेतील खातू मसाले उद्योगाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून १ लाख रुपयांची देणगी आणि कॅन्सरवरील संशोधनासाठी 50 हजारांची देणगी दिली आहे. Social Commitment of Khatu Masala Udyog विशेष म्हणजे अशी देणगी द्या असे विनंती कोणीही केलेली नसताना हे काम खातू परिवाराने केले आहे.
Social Commitment of Khatu Masala Udyog
याबाबत खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम खातू म्हणाले की, एकदा खातू मसाले उद्योगमध्ये आयकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले होते. त्यांचे काम संपल्यावर गप्पा मारत असताना देशासाठी लढणारे जवान, त्यांची कुटुंबे, वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबाचे नंतरचे जीवन हा विषय चर्चेत आला. उद्योजकांनी शासनाला कर देताना काही रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर त्याचा उपयोग कशापध्दतीने सैनिकांच्या कुटुंबाना होतो. याचा अनुभव एका अधिकाऱ्याने सांगितला. त्याचवेळी आपणही आपल्या उद्योगाला भराव्या लागणाऱ्या कराच्या काही टक्के रक्कम देशहिताच्या कामाला देणगी स्वरुपात दिली पाहिजे. Social Commitment of Khatu Masala Udyogअसा निश्चय आम्ही सर्वांनी केला. आमचे आर्थिक सल्लागार दत्ते यांनी देखील होकार दिला. त्याचवेळी सैनिक कल्याण निधी बरोबर आरोग्य क्षेत्रालाही काही रक्कम द्यावी अशी चर्चा झाली. आजही टाटा स्मारक केंद्रातर्फे कॅन्सरवरील उपचारांसाठी संशोधन सुरु आहे. या संशोधनाला साह्य करण्याचे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाला रु. 1 लाखाची आणि टाटा स्मारक केंद्राला 50 हजाराची देणगी आम्ही थेट बँकतर्फे पाठवली. इमेल द्वारे अशी देणगी पाठवत असल्याचे त्यांना कळवले. Social Commitment of Khatu Masala Udyog
एवढी मोठी रक्कम दोन संस्थांना पाठवल्यानंतर त्या संस्थामधील अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना आश्चर्य वाटले की, कोणत्याही स्वरुपाची विनंती, मागणी नसताना, खातू मसाले उद्योगाने ही देणगी कशी दिली. उद्योजकांनी स्वत:हून पुढे येवून असा निधी दिला पाहिजे असे सांगत आम्हाला धन्यवाद दिले. Social Commitment of Khatu Masala Udyog