कोल्हापूर विभागातील पहिल्या एमडीआरटी, सर्वस्तरातून अभिनंदन
गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष, विमा प्रतिनिधी स्नेहा संतोष वराडे यांनी चालू वर्षात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर विभागात अवघ्या वीस दिवसात प्रथम एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. 2022 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी त्या पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विमा प्रतिनिधी संतोष वराडे आणि पत्नी स्नेहा वरंडे हे दोघेही गुहागर वासियांना उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत आहेत. सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांमुळे ते त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत आले आहेत. स्नेहा वरंडे या गुहागरच्या माजी नगराध्यक्ष आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून त्या गेले अनेक वर्ष एजंट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी तीन वेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तर संतोष वरंडे यांनी सहावेळा असे मिळून वरंडे घराण्याला ९ वेळा हा सन्मान मिळाला आहे.
गतवर्षी मार्चपासून कोरोना महामारीच्या संकटातही स्नेहा वरंडे यांनी आपल्या कामात सातत्य ठेवत अवघ्या वीस दिवसांत कोल्हापूर विभागात प्रथम एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच देश पातळीवरही काही मोजक्याच विमा प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. यासाठी पती संतोष वरंडे आणि गुहागर कार्यालयातील सर्व सहकारी, मित्र परिवार, हितचिंतक, विमेदार यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कामगिरीबद्दल लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया शाखेच्या वतीने स्नेहा वरंडे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी चिपळूण शाखेतील शाखा व्यवस्थापक साईनाथ मेस्त्री, सहाय्यक व्यवस्थापक संजय बाबर, विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, लियाफी शाखेचे अध्यक्ष मनोज भाटवडेकर, माजी अध्यक्ष महेश मिर्लेकर, डिव्हिजनल कौन्सिलचे माजी अध्यक्ष राजेश गांधी, विमा प्रतिनिधी उपस्थित होते.