गुहागर : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली (ता. गुहागर) या प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कलाशिक्षक स्वरूपकुमार केळस्कर यांच्या पुढाकाराने आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी ९० विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकार झालेल्या आकाश कंदिलाचे प्रदर्शन प्रशालेच्या आवारात करण्यात आले होते.
On the initiative of art teacher Swaroop Kumar Kelaskar, a competition was held to make sky lanterns at Chandrakant Bait Vidyalaya Abloli, run by Lokshikshan Mandal Abloli. In this competition, the sky lanterns created by the ingenious intelligence of the students were displayed in the school premises.


यामध्ये इकोफ्रेंडली आकाशकंदील, टाकाऊ पासून टिकाऊ आकाश कंदील, कोरोना संदेश नियमावली दाखविणारे आकाश कंदील, मायक्रम धाग्यापासूनचे आकाश कंदील, विविध कागदांच्या पासून विविध माध्यम विविध आकारात साकार झालेले आकाश कंदील विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीतून साकार झाले होते. ह्या उपक्रमाचे स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या तिन्ही संकल्पनेतून आयोजन केले होते. स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या हेतूने हा उपक्रम जरी राबवण्यात आला असला तरी सुद्धा प्रत्येक इयत्तेतून इ.५ वी ते १o वी मधील एक याप्रमाणे सहा प्रथम क्रमांक काढण्यात आले व गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कु. याज्ञवल्क्य फंड ( ५वी ), कु. सोनम लवटे ( ६वी ), कु.श्रेया भुते ( ७ वी ), कु.आर्यन पागडे (८वी ), कु. श्रावणी जाधव ( ९वी ), कु. मयुरी रसाळ ( १०वी ) या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
आकाश कंदील प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक डी.डी. गिरी यांनी केले. यावेळी पालक -शिक्षक संघ उपाध्यक्ष आशिष भोसले, माजी सरपंच प्रमोद गोणबरे, केंद्रप्रमुख रवींद्र कुळे, अनंत पवार, नारायण सुर्वे यांसह शिक्षक-पालक तसेच कला क्षेत्रात काम करणारे संदेश पांचाळ, प्रतीक्षा पांचाळ हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थांचे कौतुक केले. प्रशालेतील कलाशिक्षक स्वरुपकुमार केळस्कर यांनी सूत्रसंचालन तर वैभव ढवळ यांनी आभार मानले.

