गुहागर : प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिष्यवृत्ती परीक्षेचा(Scholarship Examination) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी(Patpanhale Education Society) संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे(New English School and Junior College, Patpanhale) या विद्यालयातील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थी कु. वेदांत किरण शिवणकर याने ८१.३४ टक्के संपादन करून सेट कोड जे ग्रामीण(Set code J rural) या विभाग यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १० वा तर गुहागर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
सेट कोड जे ग्रामीण(Set code J rural) या विभागात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे(New English School and Junior College, Patpanhale) विद्यालयातील कु. विद्या पुण्यवंत सरक हिने ६६.६७ टक्के संपादन करून रत्नागिरी जिल्हा यादीमध्ये(Ratnagiri District List) ६० वा क्रमांक पटकावून गुहागर तालुक्यात ५ वा क्रमांक संपादन केला आहे. कु. फहिम अनिस धामस्कर याने ६२ टक्के गुण संपादन करून जिल्हा यादीमध्ये ८६ वा तर गुहागर तालुक्यात ७ वा क्रमांक पटकावला आहे. कु. हर्षदा संदीप पालकर हिने ५९.३३ टक्के गुण संपादन करून जिल्हा यादीमध्ये ११० वा क्रमांक पटकावून गुहागर तालुक्यात ८ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच सेट कोड (ए )( Set code (a)) ग्रामीण सर्वसाधारण विभागात(Rural General Department) कु. प्रेमचंद चंद्रकांत बेलेकर याने ५१.३३ टक्के गुण संपादन करून गुहागर तालुक्यात ४ था क्रमांक पटकावला आहे. कु. दिव्या पु्ण्यवंत सरक हिने ५१.३३ टक्के गुण संपादन करून गुहागर तालुक्यामध्ये ५ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच प्राथमिक गटामधील इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत(Scholarship Examination) इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी कु. मानसी संदीप पालकर हिने सुयश संपादन केले आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये(Secondary Scholarship Examination) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी उज्वल सुयश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. सुशांत मुंडेकर, श्री. एस. एम. आंबेकर, सौ. एन. पी. वैद्य , सौ. नांदलस्कर आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे(Patpanhale Education Society) अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, खजिनदार सौ. सुजाता चव्हाण व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एस. डी. हिरवे, पर्यवेक्षक एस. टी. गावडे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.