सरपंच संजय पवार यांची माहिती
गुहागर : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ(Central market) असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेतील दर शनिवारी भरणारा आठवडा बाजार(Weekly market) वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे(Corona outbreak) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तालुका प्रशासनाच्या(Taluka administration) निर्देशानुसार कोरोना काळातील संसर्ग(Infection) निर्बंध (Restrictions) म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे (Patpanhale Gram Panchayat) सरपंच संजय पवार यांनी दिली. दरम्यान, पुढील आदेश (Order) येईपर्यंत हा शनिवार आठवडा बाजार(Saturday Weekly Market) बंद राहिल, असे पवार म्हणाले.
शनिवारच्या शृंगारतळी(Shrungartali) बाजारापूर्वी आठवडा बाजारातील परजिल्ह्यातील व्यापारी(Merchant) सावर्डे, मार्गताम्हाणे, शृंगारतळी, गुहागर व आबलोली अशा बाजारातून आठवडाभर फिरत असतात व त्यांच्यामुळे कोरोना(Corona) अधिक संक्रमित होण्याची शक्यता वाटते. येथील आठवडा बाजारात संपूर्ण तालुक्यातील ग्राहक(Customer) येत असून पूर्ण बाजारपेठेत त्यानिमित्ताने मोठी गर्दी असते, असे पवार यांनी सांगितले.
कोरोना काळ(Corona period) संपला असे वाटत असताना या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागच्या वेळी जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण(Corona infected patient) शृंगारतळी येथे सापडला होता. सध्या बाजारपेठेत फिरणारे अनेक जण मास्क(Mask) वापरताना दिसत नाही. त्यामुळे आठवडा बाजारावर एवढे नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने आम्ही आठवडा बाजार बंद करत आहोत असे सरपंच म्हणाले.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये नुकत्याच झालेल्या तहसील(Tehsil) व पोलीस निरीक्षक (Inspector of Police) व व्यापाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाचे नियम सक्तपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई(Punitive action) करण्यात येईल. प्रत्येक व्यापाराकडे ज्या ग्राहकांकडे मास्क नसेल त्याला मास्क घालण्यास सांगावे अशा सूचना(Notice) देण्यात आल्या आहेत असे पवार यांनी सांगितले.