गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेतील आठवडा बाजार तब्बल दीड वर्षानंतर १३ नोव्हेंबरला पुन्हा सुरू होत असल्याची माहिती पाटपन्हाळे ग्रा.पं. सरपंच संजय पवार यांनी दिली.
Patpanhale in Guhagar taluka in Shringartali market within the limits of the village It is learned that the weekly market will resume on November 13 after a year and a half Patpanhale G.P. Presented by Sarpanch Sanjay Pawar.
१९९७ साली पाटपन्हाळेचे तत्कालीन सरपंच अजित बेलवलकर यांनी शृंगारतळीतील बाजारपेठेत आठवडा बाजाराची संकल्पना राबविली. त्यावेळी बाजारातील काही व्यापाऱ्यांनी या संकल्पनेला विरोध केला होता. सावर्डे येथील आठवडा बाजाराच्या धर्तीवर शृंगारतळीतील आठवडा बाजाराला त्यावेळी आठवडा बाजारातील दुकानदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता व ही बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ ठरली. कराड, पाटण, सांगली, महाबळेश्वर या पश्चिम महाराष्ट्रातल्या व्यापारपेठेतून येणारा ताजा भाजीपाला सर्व प्रकारचा किराणा, घरगुती उपयोगाच्या वस्तू याची मोठी पेठ यानिमित्ताने गुहागर तालुक्यातील जनतेसाठी खुली झाली. शृंगारतळीतील आठवडा बाजारनंतर मार्गताम्हाने, गुहागर व खोडदे येथेही आठवडा बाजार सुरु झाला.
या आठवडे बाजाराच्या निमित्ताने ग्रा.पं. पाटपन्हाळेला सुमारे एक लाख रुपये प्रतिवर्षी उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोना महामारीच्या काळात दीड वर्षापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेबरोबरच आठवडा बाजारही बंद झाला. शृंगारतळी बाजारपेठेत तालुक्यातून येणाऱ्या शेकडोंच्या संख्येने लोंढा बाजारपेठेत येण्याचे बंद झाले. अनेक व्यापारी व ग्राहक ग्रा.पं.कडे कधी आठवडा बाजार सुरु होणार याची विचारणा करू लागली. मध्यंतरी आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार यांची भेट घेऊन बाजार सुरु करण्याची विनंती केली होती. सरपंच संजय पवार यांनी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यांच्याशी चर्चा करून आठवडा बाजार सुरु करण्याविषयी संमती मिळवली व त्यानुसार शनिवारी १३ नोव्हेंबरला शृंगारतळीतील आठवडा बाजार सुरु होणार आहे.