गुहागर : खालचापाट येथील श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान देणाऱ्या कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला.
On behalf of Shri Varati Devi Navratra Utsav Mandal at Khalchapat, on the occasion of Autumn Navratra celebrations, Covid warriors who contributed for the liberation of the taluka Corona during the Corona period were honored.
श्री वराती मातेच्या नवरात्र उत्सवाला २०१२ पासून सुरुवात करण्यात आली. दरवर्षी यानिमित्ताने विविध कार्यक्रम साजरे केले जातात. परंतु, गेली दोन वर्षे जगावर कोरोनाचे संकट ओढवल्याने या उत्सवावर निर्बंध आले. श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून दर मंगळवारी आरती, नवरात्र उत्सवात दर दिवशी आरती गोयथळे खोत, मोरे खोत मंडळी करतात. तालुक्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपले योगदान देणाऱ्या खालचापाट येथील नगरपंचायत कर्मचारी गणेश पावसकर, समर्थ भोसले, अभिजित मोरे, नम्रता गोयथळे, मनोज सुर्वे, राजन परकर, आशा सेविका नेहा वराडकर, निधी सुर्वे, परिचारिका सोनल पावसकर, रेषा भोसले, अंगणवाडी मदतनीस दक्षता मोरे आदी कोविड योद्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन देवीच्या मंदिरात सन्मान करण्यात आला.
यावेळी सुनील गोयथळे, दिलीप गोयथळे, नगरसेवक अमोल गोयथळे, नितीन गोयथळे (खोत), अजित मोरे (खोत), राकेश गोयथळे, विद्याधर गोयथळे, महेंद्र पाटील, समिल मोरे, गजानन मोरे, रवींद्र विखारे, संतोष मोरे, पराग भोसले, प्रकाश गोयथळे, नागरसेविका मृणाल गोयथळे, मधुकर पाटील, मंगेश पाटील, मंदार गोयथळे, योगेश गोयथळे संकेत गोयथळे, तेजस गोयथळे, तनय गोयथळे, उमेश गोयथळे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.