गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक देवदीपावली उत्सव दि. 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
Annual Devdipavali festival of village goddess Shri Sukai Devi of Talwali village in Guhagar taluka On Will pass on December 4th.
गुहागर तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी देवदीपावलीला ग्रामदेवता मंदिरात वार्षिक देवदीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 6 ते 6.30 देवीला रूपे लावणे, सकाळी 8.30 हळदीकुंकू, 8.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 11.30 वा. महाआरती, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद (श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1, संध्या. 7.30 ते 11 चिंचवाडी नं.1, देऊळवाडी व आगरवाडी नं.1 यांचे भजन, रात्री 11.30 वाजता श्री सुकाई देवी बहुरंगी तमाशा पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी श्री सुकाई देवी कमिटीच्यावतीने केले आहे.