श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
गुहागर : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने कार्तिकोत्सवाचे बुधवार दि. 17 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उद्या मंगळवार दि. 16 रोजी श्री देव कोपरी नारायण मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या इटालियन मार्बल पासून बनविलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे.
Kartikotsava on Wednesday on behalf of the famous Shri Dev Kopari Narayan Devasthan Fund at Guhagar Varchapat. It is being held in a traditional manner from 17th to 21st November. On this occasion, tomorrow, Tuesday. On the 16th The installation ceremony of idols made of Italian marble by Shri Swami Samarth Maharaj and Shri Gajanan Maharaj will be held at Shri Dev Kopari Narayan Mandir.
वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने दरवर्षी कार्तिकोत्सव विविध धार्मिक व सांकृतिक कार्यक्रमानी पार पडत असतो. या देवस्थानच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गुहागर शहरात श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांचे मंदिर नाही. शहरातील नागरिक अन्य ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात. या देवस्थानने भाविकांची ही कमतरता लक्षात घेऊन श्री देव कोपरी नारायण मंदिरात लाकडापासून सुबक नक्षीकाम करण्यात आली आहे. मंदिराची ही कलाकृती भाविकांसह पर्यटकांना आकर्षित करणार आहे. हा कार्तिकोत्सव आणि दर्शन सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून श्री देव कोपरी नारायण मंदिरात दुपारी 4 ते रात्री 9 वा. होणार आहे. तरी समस्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंडच्यावतीने करण्यात आले आहे.