गुहागर : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या (Gram Panchayat Abloli) सरपंच पदी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्या श्रावणी अनिकेत पागडे (Shravani Pagade) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी सरपंच अल्पिता पवार (Former Sarpanch Alpita Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी श्रावणी पागडे यांची निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी सरपंच निवडणूकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एस.पी.गवळी यांनी काम पाहिले. गेली पंचवीस वर्षे सर्व ग्रामस्थांच्या सहविचाराने तंटामुक्त समितीच्या माध्यमातून आबलोली ग्रामपंचायतची सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध होत आहे.सर्व प्रभागांना सरपंच-उपसरपंच पदाचा कालावधी निश्चित करून त्याप्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व निवडी बिनविरोध होत आहेत. नूतन सरपंच श्रावणी पागडे या उच्चशिक्षित असून त्यांनी सामाजिक कार्यातही आपले योगदान दिले आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल प्रभारी सरपंच तुकाराम पागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विद्याधर कदम,पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच महेंद्र कदम, विजय वैद्य, प्रमोद गोणबरे, शांताराम पागडे, नरेश निमुणकर, सचिन कारेकर, ग्रामसेवक बी.बी.सूर्यवंशी, के.बी. उकार्डे, अनिकेत पागडे, शंकर पागडे, दत्ताराम कदम, प्रवीण भंडारी, ग्रामपंचायत सदस्य आशिष भोसले, प्रमेय आर्यमाने, मीनल कदम, पुजा कारेकर, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ यांसह गावातील सर्व वाड्यांचे प्रमुख मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.गावातील सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार गावाचा विकास अविरत सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील असे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच श्रावणी पागडे (Shravani Pagade)यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल गावातील सर्व समाज घटकातून अभिनंदन करण्यात येत आहे.