शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा इशारा
गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन बंदला वेगळे वळण देण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिक त्याला जशाच तसे उत्तर देण्यास सज्ज झाले आहे. त्याचे पडसाद नक्कीच गुहागर तालुक्यात उमटतील असा इशारा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी दिला आहे.
In the wake of the Lakhimpur tragedy in Uttar Pradesh, politically motivated bandhs are taking a different turn on social media. Shiv Sainik is ready to answer him anyway. Taluka chief Sachin Bait on behalf of Shiv Sena, a constituent party of Mahavikas Aghadi, has warned that its repercussions will definitely be felt in Guhagar taluka.
महाविकास आघाडीच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी रविवारी कोरोना संकटातून सावरणाऱ्या व्यापारी वर्गावर महाराष्ट्र बंदसाठी जबरदस्ती करू नये, असे आवाहन केले होते. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असल्याने शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष म्हणून सेनेची भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्र बंद हा सनदशीर मार्गाने आमचा बंद होता. व्यापाऱ्यांना जर कोणी भडकवून दुकाने उघडी ठेवण्यास सांगत असेल तर आम्ही कोणाला सोडणार नाही. व्यापारी पण महाविकास आघाडी सरकारच्या बंदला सहकार्य करत आहेत. मात्र, आम्हाला जबरदस्तीने दुकाने उघडण्यास सांगितले जात आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जर असे कोणी करत असेल तर हे प्रकरण अधिक चिघळले आणि हे प्रकरण हाताबाहेर जाईल. जर कोणी राजकीय हेतून व्यापाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल आणि या प्रकाराला सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवसेना त्यांना तोडीस तोड उत्तर देईल. शिवसेना जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा कोणाची हिंमत नाही येऊन लढण्याची, असा इशारा श्री. बाईत यांनी दिला आहे.