सेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या प्रयत्नानी तालुक्यात सुरू केलेले “गाव तिथे शाखा आणि घर तिथे महाराष्ट्र सैनिक” ह्या उपक्रर्माअंतर्गत तालुक्यातील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पक्षप्रवेश केला. ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश झाल्याने सेना, भाजपला मोठा धक्का आहे.
यावेळी जानवळे, उमराठ, वेळंब पांगारी (भुवडवाडी) गावातील शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यांमध्ये सुशांत कोळंबेकर, अभिषेक जालगावकर, सिध्देश आग्रे, अक्षय बैकर, अमित कोळंबेकर, शुभम शिंदे, स्वप्नील वणगे, शुभम बैकर, प्रणित नबेकर, शैलेश गावणंग, मयुर गावणंग, मुकुंद आंबेकर, सचिन भुवड, नितीन भुवड, दिलीप भुवड आदींचा समावेश आहे. या प्रवेशकर्त्यांचा तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका वाहतुक सरचिटणीस विनायक दणदणे, उपतालुकाध्यक्ष धर्मराज कदम यांनी स्वागत केले. यावेळी मनसेचे गणेश डेरवणकर, कौस्तुभ कोपरकर, विराज साळवी, निलेश गमरे, शंकर आंबेकर, प्रसाद विखारे, नितीन कारकर, संतोष बसणकर, संदिप आंबेकर, संजय भुवड, सुनिल भुवड, समिर भुवड आदी उपस्थित हाेते.