शाहू ग्रंथांचे वाटप करून केले अभिवादन
गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने आरक्षणाचे जनक लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी तालुक्यातील विविध मान्यवर व विद्यार्थी यांना शाहू महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथांचे वाटप करून अभिवादन करण्यात आले.
On behalf of Kastrib Teachers Association, Maharashtra State Taluka Branch, Guhagar, various dignitaries and students of the taluka were greeted on the birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj, the father of reservation, by distributing books on his life.
यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्री. महेश नाटेकर, गुहागर पंचायत समिती सभापती सौ. पूर्वी निमुणकर , पंचायत समिती सदस्य श्री. रवींद्र आंबेकर, तहसीलदार श्रीमती लता धोत्रे, गटशिक्षणाधिकारी श्री. वामनराव जगदाळे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री.सचिन बाईत, रिपाई जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. लीना भागवत, डॉक्टर अभिजित वाटेगावकर, ओबीसी संघर्ष समिती पांडुरंग पाते, माजी सरपंच श्री. नरेश निमुणकर आदी प्रमुख व्यक्तींसह विद्यार्थ्यांना शाहू ग्रंथांचे वाटप करण्यात आले.
कास्ट्राईब शिक्षक संघटना ही नेहमीच महापुरुषांची विचारधारा विद्यार्थ्यांबरोबर समाजात पोहोचवण्यासाठी नेहमी कार्यरत असते आणि या संघटनेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे मत यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर व पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाहू जयंती चा कार्यक्रम येणे शक्य नाही त्यामुळे शाहू महाराजांचे विचार शक्य तितक्या व्यक्तींपर्यंत पोचविण्यासाठी ग्रंथ भेट हा उपक्रम राबवला गेल्याचे सांगितले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, तालुक्याचे कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, सचिव प्रकाश गोरे , कोषाध्यक्ष सुहास जाधव सहसचिव वैभव पवार यासह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.