गुहागर : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील तरुण उत्साही मंडळाच्या वतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त वरवेली तेलीवाडी येथील शक्तीवाले शाहीर, भजनी बुवा व मृदुंगमणी सूर्यकांत नारायण रसाळ यांचा मंडळाचे अध्यक्ष दशरथ किर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभाकर किर्वे, दिपक किर्वे, गणेश किर्वे, निलेश रसाळ, संतोष किर्वे व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री काशी विश्वेश्वर मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवपिंडी पूजन, अभिषेक,आरती, दुपारी विविध खेळांचे कार्यक्रम, रात्री महाआरती, सत्कार सोहळा व स्थानिक भजन आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेलीवाडी स्थानिक मंडळ व महिला मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली.