तरुणही मदतीसाठी सरसावले
गुहागर : बुधवारी रात्रीपासून चिपळूण मध्ये महापुराने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात हा मोठा पूर असल्याने घरे, दुकाने आणि इमारतींचे खालचे मजले पुराच्या पाण्यात गेले होते. अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले होते. गुरुवारी प्राथमिक स्थरावर नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी गुहागर तालुक्यातील अंजनवेलमधून पाच तर वेलदुर येथून दोन मच्छिमारी बोटी चिपळूणमध्ये दाखल झाल्या आहेत. या मदत कार्यात दोन्ही गावातील तरुणही सहभागी झाले आहेत.
Extreme levels of flood danger were announced in Chiplun on Wednesday night. Many civilians were trapped in the floodwaters. Thursday to evacuate civilians from the floodwaters at the primary level Five fishing boats from Anjanvel in Guhagar taluka and two from Veldur have arrived in Chiplun. Young people from both the villages have also participated in this relief work.
बुधवारी रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झाले असून २००५ पूर्वी पेक्षा मोठे संकट ओढावले होते. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये दहा ते बारा फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. याशिवाय शेकडो दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले होते. महापुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथक येईपर्यंत वेळ जाणार म्हणून प्रशासनाने गुहागर पोलिसांच्या मदतीने मोडकाआगर धरणातून फायबरच्या बोटी तर वेलदुर मधून निलेश पड्याळ व मनीष पटेकर यांच्या मालकीच्या बोटी ट्रकातून नेण्यात आल्या. या बोटींसह निलेश पड्याळ, किशोर पड्याळ, विकास जांभारकर, प्रमोद पाटेकर हे तरुण, तसेच अंजनवेल गावातून ५ फायबर होड्या रोडमार्गे चिपळूण येथे पाठविण्यात आल्या. सोबत संजय शां. सैतवडेकर, सुशांत सं. नरवणकर, राज सैतवडेकर, विनोद सैतवडेकर, सुशिल सं. कांबरे, दत्ताराम दे. केंबळे, नरेश गु. मिशाळ, संजोग सं. खडपेकर भोई समाजबांधव मदतीसाठी सरसावले होते.
तसेच गुहागर मधील काही सामाजिक कार्यात काम करणाऱ्या तरुणांनी महिला, पुरुष व छोट्या मुलांना वापरता येतील असे चांगले कपडे, वापरण्याजोगे अन्य कपडे (बेडशीट, चादर, टॉवेल, आदी) आणि लाद्या पुसायला वापरता येतील असे कपडे या पध्दतीने वर्गीकरण करुन स्वतंत्र गठ्ठे करुन संकलन करत होते. तसेच पुराचे पाणी ओसरल्यावर अन्य विविध प्रकारची मदत पोचविण्याचे काम गुहागरातून होणार आहे.