गुहागर : तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ग्रामपंचायतवर आतापर्यंत प्रशासक कार्यरत होते. परंतु या ग्रामपंचायतची सरपंच निवडणूक लागल्याने यावेळी शिवसेनेचे संदीप धनावडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्री. धनवाडे यांना बिनविरोध जाहीर केले.
यानंतर संदीप धनावडे यांनी आमदार भास्करशेठ जाधव, जि. प. अध्यक्ष श्री विक्रांत जाधव तसेच वडद गावातील सर्व मतदार व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.