गुहागर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वेळणेश्वर गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी आ. भास्करराव जाधव आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचे निष्ठावंत असलेले वाडदई गावचे सामाजिक कार्यकर्ते व गेली दोन वेळा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद भूषविलेले श्री. विनायक कांबळे यांची निवड झाली आहे.
He has been appointed as the chairman of Velneshwar village dispute free committee. Loyal to Bhaskarrao Jadhav and Zilla Parishad member Netra Thakur Social worker of Waddai village and has been the chairman of the dispute free committee for the last two times Mr. Vinayak Kamble has been selected.
पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वेळणेश्वर ग्रामपंचायतीवर गाव पॅनलने बाजी मारत सत्ता प्रस्थापित केली. परंतु, ग्रामपंचायतीची पहिलीच ग्रामसभा तहकूब होण्याची नामुष्की ओढवली. नुकत्याच झालेल्या गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी गाव पॅनल विरुद्ध शिवसेना असे चित्र दिसत होते. यात कोण बाजी मारतो याकडे गावातील सर्वांचे लक्ष लागले होते. या चुरशीच्या अध्यक्ष पद निवडीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी संदीप ठाकूर यांनी सरपंच चैतन्य धोपावकर यांचे नाव सुचवले. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीनुसार सतीश मोरे यांचे नाव सुचवले. त्याला संदीप भेकरे यांनी अनुमोदन दिले. सतीश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत रविंद्र पोळेकर यांनी गावातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांच्या नावाची तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी नाव घेतले. तर विलास कांबळे यांनी वेळणेश्वर ग्रामपंचायतीमध्ये विकासाभिमुख काम करणारे आणि सरपंच पदाच्या पाच वर्षांच्या काळात एकदाही ग्रामसभा तहकूब न ठेवणारे, माजी सरपंच नवनीत ठाकूर यांच्या कार्यकाळात गेली दोन वर्षे तंटामुक्ती समितीचे काम पाहणारे आणि गावातील कायदा – सुव्यवस्था चांगल्याप्रकारे ठेवणारे विनायक कांबळे यांच्या नावाची शिफारस केली. त्यावर उपस्थित ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, वेळणेश्वर ग्रामपंचायतीवर गाव पॅनलची सत्ता असली तरी सेनेने तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पद निवडीवर बाजी मारली आहे. विनायक कांबळे यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.