गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय डिंगणकर, सुवेल पावरी, प्रतीक पवार आणि सौरभ जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांची सिरम इन्स्टिट्यूट येथे यशस्वीरित्या निवड झालेली आहे.
Guhagar Education Society Operated Graduates of Khare-Dhere-Bhosle College, Department of Microbiology have been selected at Serum Institute of India, Pune. These students include Akshay Dingankar, Suvel Pawari, Prateek Pawar and Saurabh Jadhav who have been successfully selected at the Serum Institute.
गुहागर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय आपल्या स्पर्धात्मक लाभले असून मायक्रोबायोलॉजी विभागातील विभागप्रमुख प्रा. निळकंठ भालेराव व प्रा. संतोष जाधव, महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. गोविंद सानप यांची निवड प्रक्रियेमध्ये मोलाचे सहकार्य लाभले. या निवड प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे महेश भोसले यांनी अभिनंदन केले आहे.