• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिष्यवृत्ती योजना ठरतायत विद्यार्थ्यांना लाभदायक

by Ganesh Dhanawade
October 30, 2021
in Old News
16 0
0
शिष्यवृत्ती योजना ठरतायत विद्यार्थ्यांना लाभदायक
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोना काळात जोपासली सामाजिक बांधिलकी

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅकचे मानांकन प्राप्त झाले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय एवढ्या कमी कालावधीत नॅकचे मानांकन मिळवणारे महाविद्यालय ठरले. आज याच महाविद्यालयातील देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना लाभदायक ठरत आहेत.
The College of Engineering was started at Velneshwar in 2012 to provide international standard facilities and quality education to students from rural areas. The College of Engineering at Velneshwar received NAC rating in a short span of time.

विद्या प्रसारक मंडळाने कोविडमुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेला प्रतिसाद म्हणून मुलींसाठी महाविद्यालयात ‘कोकणकन्या शिष्यवृत्ती योजना २०२० पासून सुरू केली आहे तसेच भाभा अणुसंशोधन केंद्रातील प्रथितयश निवृत्त वैज्ञानिक महाविद्यालयात येऊन नियमित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अशा योजना विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालय राबवत आहे. उच्च शिक्षणासाठी कोकणसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल नुकतीच दिल्ली येथे आयकॉनित एज्युकेशन समीटमध्ये टॉप गॅलंट मिडियाकडून ठाणे व कोकण विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय असा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दोन वर्ष सुरू असणाऱ्या कोरोना काळात सततच्या लॉकडाऊनमुळे समाजाला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या काळात सतत समाजाची आर्थिक घडी विस्कळित झाली. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने ‘विद्या प्रसारक मंडळ शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या प्रथम १०० व थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या प्रथम ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे शैक्षणिक शुल्क (Tuition Fee) माफ केले जाणार आहे. ही योजना महाविद्यालयात प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. सदर प्रवेश सर्व सरकारी नियमांच्या अधीन राहून दिले जात आहेत. या सर्व योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील प्रा. रोहन गोंधळेकर, भ्रमणध्वनी 9004518067 व प्रा. आशिष चौधरी, भ्रमणध्वनी 8007627888 यांच्याशी संपर्क साधावा.

Tags: CollegeGuhagarGuhagar NewsMaharshi Parashuram Engineering CollegeMarathi NewsNACNews in GuhagarscholarshipStudentsकेंद्र सरकारकोकणकन्या शिष्यवृत्ती योजनाकोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यानॅकबेटी बचाओ बेटी पढाओ'मराठी बातम्यामहर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयमुंबई विद्यापीठलोकल न्युजविद्या प्रसारक मंडळ (ठाणे)वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयशिष्यवृत्ती योजनासामाजिक बांधिलकी
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.