गुहागर : तालुक्यातील डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली(Dr. Nanasaheb Mayekar Secondary School, Kazurli) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले(Krantijyoti Savitribai Phule) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दिनेश पवार(Headmaster Dinesh Pawar) हे होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले((Krantijyoti Savitribai Phule) यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सहशिक्षिका आम्रपाली जाधव(Co-teacher Amrapali Jadhav) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा(Life work) आढावा(Review) घेतला. त्यानंतर योगिनी साळवी,अमिषा गोणबरे, मानसी गोणबरे, तनुश्री देसाई, श्रुती तावडे,जय साळवी, रीया गोणबरे, रिद्धी गोणबरे आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सहशिक्षक दामोदर गोणबरे, सोनाली गमरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक दिनेश पवार यांनी सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा(The legacy of education) आपण सर्वांनी मिळून पुढे नेण्याचे आवाहन(Appeal) केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन(Hosting) समीक्षा गावडे तर आभार प्रदर्शन सेजल साळवी यांनी केले.यावेळी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
