गुहागर : नुकत्याच झालेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेमध्ये गुहागरच्या कु. सार्थक विष्णु बावधनकर यांने जेईई मेन परीक्षेत ९८.८४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. त्याला मेरीटनुसार आय.आय.टी पवई या नामांकित इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला आहे. त्याला सी.बी.एस.सी. बोर्ड एस.एस.सी. ला ९७.२० टक्के मिळाले होते. तर सी.बी.एस.सी. बोर्ड एच.एस.सी.ला ९४.०० टक्के गुण मिळाले आहेत.
कु. सार्थक याने आय.आय.टी. इंजिनियरिंग होण्याचे स्वप्न आधीपासून बाळगले होते. कोणताही खाजगी क्लास न लावता स्वयं अध्ययन करून, परिश्रम करून त्याने हे ध्येय गाठले आहे. त्याने आपले पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडमध्ये घेतले. गुहागर एस.टी. डेपोमध्ये कार्यरत असलेले कै. विष्णु बावधनकर यांचा तो धाकटा मुलगा आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.