• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण

by Manoj Bavdhankar
October 20, 2020
in Old News
24 0
0
कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण
47
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

गुहागर : रत्नागिरी जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले.  त्यामध्ये 291 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर सारी आणि इली या रोगांचे 2361 रुग्ण ही सापडले.
कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हयातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोव्हीड रुग्ण शोधण हा महत्वाचा उद्देश समोर ठेवून 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत असून पहिली फेरी 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये  15 लाख 42 हजार  612 लोकसंख्या आणि 4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट होते. त्यासाठी 686 टीम मध्ये 2029 कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
तपासणी दरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे 1 लाख 12 हजार 079 रुग्ण आढळून आले. या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून  दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडीत करण्यात आली आहे.  मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्यमध्ये लक्षणीय घट आढळून येत आहे.
दिनांक  14 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर  2020 या कालावधीत दुसरा टप्पा घेण्यात येत आहे. यामध्ये 686 पथकांमार्फत पुन्हा एकदा जिल्हयातील सर्व घरांचे पर्यायाने सर्व लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, सभापती, आरोग्य व बांधकाम समिती  महेश म्हाप व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयाने सदरची मोहिम जिल्हयात राबविण्यात आली. जिल्हयातील नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.

Tags: CoronaCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsकोरोनाकोरोना बातम्यागुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमलोकल न्युज
Share19SendTweet12
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.