व्यावसायिक 10 वे एमडीआरटी; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांनी चालू वर्षात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 2022 मध्ये अमेरिकेत होणाऱ्या एमडीआरटी कॉन्स्फरन्ससाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Santosh Varade, a leading insurance representative from Guhagar branch of Life Insurance Corporation of India (LIC), has qualified for the MDRT Conference in the United States in 2022 on the strength of his consistent performance this year.
विमा प्रतिनिधी संतोष वराडे आणि पत्नी गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे हे दोघेही गुहागर वासियांना उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम गेली अनेक वर्षे करीत आहेत. सुसज्ज कार्यालय, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांमुळे ते त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत आले आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून हे दांपत्य गेले अनेक वर्ष एजंट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पत्नी स्नेहा वरंडे यांनी चार वेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. तर संतोष वरंडे यांनी आताचा धरून सातवेळा असे वरंडे विमा सेवा केंद्राचा हा 10 सन्मान आहे.
गेली दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट आहे. अशा वेळी संतोष वरंडे यांनी आपल्या कामात सातत्य ठेवत एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यासाठी गुहागर कार्यालयातील सर्व सहकारी, मित्र परिवार, हितचिंतक, विमेदार यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या कामगिरीबद्दल श्री. वरंडे यांचे लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया शाखेचे सदस्य, एजंट होम, चिपळूण आणि हितचिंतक, विमेदार यांनी अभिनंदन केले. पत्नी स्नेहा वरंडे यांनी काही महिन्यांपूर्वी सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर कोल्हापूर विभागात अवघ्या वीस दिवसात प्रथम एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त केला होता.