एकाच वर्षात दोनवेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त करणारे जिल्ह्यातील पहिले
गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेतले श्री संतोष धाकटू वरंडे यांनी चालू वर्षात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर एकाच वर्षात दोन वेळा एमडीआरटी (अमेरिका ) हा बहुमान प्राप्त केला आहे. त्यांनी आतापर्यंत सातवेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गुहागरवासीयांना उत्तम आयुर्विमा सेवा पुरवण्याचे काम वरंडे करीत आहेत. गुहागर येथे त्यांचे सुसज्ज कार्यालय असून त्यांच्याकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे. सेवा आणि तत्परता या त्यांच्या गुणांनमुळे त्यांच्या विमेदारांच्या विश्वासाला पात्र ठरले आहेत. त्यांच्या ग्राहकांची संख्या साडेपाच हजाराहून अधिक आहे. दरवर्षी ही संख्या वाढतच आहे.
त्यांच्या पत्नी गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे या सुद्धा गेली २१ वर्ष एजंट म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी तीन वेळा व श्री. वरंडे यांनी एकूण सहा वेळा असे मिळून वरंडे घराण्याने हा सन्मान दहा वेळा मिळवला आहे. या यशात विकास अधिकारी शशिधर कान्हेरे, एजंट होम, चिपळूण शाखेतील कर्मचारी वर्ग व वरंडे विमा सेवा कार्यालयातील सर्व सहकारी, मित्र परिवार, हितचिंतक, विमेदार यांचा मोलाचा वाटा असल्याचे वरंडे यांनी आवर्जून सांगितले.