गुहागर : भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या आधी ही श्री. जैतापकर यांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे.
BJP Ratnagiri district president Under the guidance of Dr. Vinay Natu, BJP OBC Morcha Ratnagiri district president Santosh Jaitapkar has extended a helping hand to the flood victims in Chiplun. Earlier, Shri. Jaitapkar has helped the flood victims.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी यापूर्वी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे. मोफत धान्य वाटप, शासकीय कार्यालयात निर्जंतुकिकरण, रुग्णालयात लागणारी मदत अशा विविध ठिकाणी मदतीचा हात त्यांनी नेहमीच पुढे केला आहे. कोणत्याही संकटात ते नेहमीच पुढे असतात. लोकप्रतिनिधी नसतानादेखील त्यांच्याकडून केले जात असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. चिपळूण पूरग्रस्तांना त्यांनी नुकतीच स्वतः धान्य किट, पिण्याच्या पाण्याची बॉटल आणि इतर साहित्य मदत म्हणून दिली. तालुक्यातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते ही चिपळूण पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे आहेत. या सर्वांना माजी आम. डॉ विनय नातू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.