कॅन्सर डे निमित्त विशेष उपक्रम
गुहागर : येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनी व वेलदुर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर डे च्या निमित्ताने अंजनवेल फाटा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, वेलदुर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक असीम कुमार सामंता यांनी आपल्या जीवनात असलेले स्वच्छतेचे व रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना ते अंगी करण्याचे आव्हान केले. तसेच लवकरच कंपनीच्या वतीने अंजवेल फाटा येथे ट्रीट लाईटची व्यवस्था, परिसर सुशोभीकरण आणि रस्त्याच्या बाजूस दिशादर्शक व माहिती देणारे फलक लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी कंपनीचे जीएम एच. एस. बावा, श्री. थामस, एचआर प्रमुख जॉन फिलिप्स, सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी, ग्रामपंचायत वेलदूरचे सरपंच रामचंद्र डांगे, माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, पंचायत समिती सदस्य स्मिता धामणस्कर, माजी सरपंच नंदकुमार रोहिलकर, प्रभाकर नायनाक आदी उपस्थित होते.

