गुहागर : चिपळूण महापुरात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी मदतीचा हात म्हणून जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनच्यावतीने चिपळूण पूरग्रस्त भागातील मुरादपूर गंधारेश्वर मंदिर, पेठमाप तांबट आणि परिसर तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या संदेशाप्रमाणे स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत खेड व गुहागर तालुक्यातील संस्थांनचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
Citizens have been severely affected in the Chiplun floods. As a helping hand, Jagadguru Narendracharya Maharaj Sansthan cleaned the Muradpur Gandhareshwar temple, Pethmap Tambat and the area in the flood-hit area of Chiplun as per the message “You live, live another”. Activists and office bearers of institutions in Khed and Guhagar talukas had participated in this cleaning campaign.
यावेळी मुख्य पिठ युवा निरीक्षक श्री. अविनाश जागुष्टे, पिठ धर्मक्षेत्र प्रमुख श्री. दत्तात्रय मोरे, प्रभारी निरीक्षक श्री. सुनील वीर, जिल्हा अध्यक्ष श्री बाळकृष्ण चव्हाण,जिल्हा महिला अध्यक्ष सौ.सिध्दी दुर्गवळी, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. विलास बेंद्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. विनायक पोळेकर, आणि जिल्हा सेवा समिती व तालुका सेवा समितीचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.