तात्कालीन दुय्यम निबंधकासह ८ जाणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
गुहागर : गुहागर तालुक्यात गिमवी येथे २००९ मध्ये झालेल्या जमिन विक्रीमध्ये मुळ जागामालका ऐवजी बनावट जागा मालक उभे करून जमिनीची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तात्कालीन दुय्यम निबंधकासह ८ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
In the sale of land at Gimvi, there was an incident where the land was sold by setting up a fake landlord instead of the original landlord. Guhagar police station has registered a case of fraud against 8 persons including the then secondary registrar.


गुहागर तालुक्यातील गिमवी येथील समिर राजाराम जाधव यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये १७ ऑगस्ट २००९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सदर गुन्हा घडल्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीच्या सामाईक मालकीची सर्वे नं. ८९० ही मिळकत आहे. या जमिन मिळकतीमध्ये फिर्यादी व फिर्यादीची आई यांच्याएवजी दुसरे बनावट इसम दुय्यम निबंधक गुहागर यांच्या समक्ष उभे करून बनावट खरेदीखत तयार करून फसवणूक व ठकवणूक करून जमिन विक्री केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी किशोर किसन जाधव, पंकज रजनीकांत खेडेकर, सुमित्रा किसन जाधव(मयत), संतोष किसन जाधव, कृष्णा गणपत जाधव(मयत), सर्व राहणार गिमवी, भैरूमल सोगालाल ओसवाल, राहणार चिपळूण, अमित विश्वपाल चव्हाण, राहणार गुहागर व तात्कालिन दुय्यम निबंधक (नाव महित नाही) वय अंदाजे ४५ यांच्यावर भादवी कलम ४२०, ४१९, ४६४, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार हनुमंत नलावडे करत आहेत.