तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईतांनी केली ग्रामस्थांचे गैरसोय दूर
गुहागर : गुहागर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत असो वा चिपळूण तालुका सर्वच ठिकाणी आपल्या लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटवला आहे. राजकारणाला समाजिकतेची जोड देऊन नागरिकांना अभिप्रेत असलेले काम ते करताना दिसत आहेत. आमदार भास्करराव जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील साडेजांभरी सातवीण फाटा ते खालचीवाडी मार्गे देऊळवाडी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली होती. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगूनही दुर्लक्ष झाल्याने निर्मल ग्रामपंचायत साडेजांभरी यांच्यावतीने तालुकाप्रमुख बाईत यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन सदरील मार्गावरील खड्डे ग्रामस्थांच्या सहकार्याने मातीने बुजविण्यात आले. बाईत यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गुहागर तालुक्यातील सडेजांभरी हे दुर्गम गाव आहे. ग्रामस्थांना गेली अनेक महिने मार्गावरील खड्डे तुडवत ये जा करावी लागत होती. दुरावस्था झालेल्या रस्त्याबाबत इथल्या नागरिकांनी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना कळविले होते. आज नाही उद्या मार्गावरील खड्डे भरले जातील अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. परंतु, गणपती सण काही दिवसांवर आला असताना त्याआधी गावातील रस्ता चांगला व्हावा, यासाठी अखेर साडेजांभरी ग्रामपंचायतीने सेनेचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांना 9 ऑगस्ट रोजी पत्र पाठवले. त्यानंतर जांभारीच्या सेनेच्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या वनिता डिंगणकर यांनीही बाईत यांचे चिरंजीव शुभम बाईत याच्याकडे पाठपुरावा करून चार दिवसात तालुकाप्रमुख बाईत यांनी आपले जेसीबी, डंपर साडेजांभरी मध्ये पाठवून ग्रामस्थांच्या श्रमदानाने 4 किलोमीटर अंतरावरील खड्डे मातीने भरण्यात आले.
यावेळी सरपंच अंकुश माटल, वनिता डिंगणकर, महादेव माटल, महेश माटल, गणेश माटल, गोविंद वेलुंडे, गणपत वेलुंडे, पांडुरंग बारस्कर, रत्नाकर सोलकर, सुरेश घेवडे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या कामाबाबत तालुकाप्रमुख बाईत म्हणाले की, मी कोणतेही मोठे काम केलेले नाही. आ. भास्करराव जाधव साहेबांच्या नेहमी सूचना असतात की, प्रशासन वेगवेगळ्या कामात गुंतलेला असेल तर कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या या सूचनेनुसारच गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या मदतीची किंवा निधीची वाट पाहत न राहता ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.