• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वतंत्र आरोग्य यंत्रणा निर्माण करावी – डॉ. नातू

by Ganesh Dhanawade
August 29, 2020
in Old News
20 0
0
Niramay Hospital
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

25.8.2020

गुहागर : दाभोळ वीज कंपनीने सुरु केलेले निरामय हॉस्पिटल सध्या वापराविना पडून आहे. याबाबत शिवतेज फाऊंडेशनने मोहीम सुरु केली. मात्र अनेक वर्ष पडून असलेल्या इमारतीचा देखभाल खर्च मोठा असल्याने शासनाने निरामय रुग्णालयाची वास्तू ताब्यात घेतली नाही. त्यानंतर हा विषय थांबला होता. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. नातूंनी पुन्हा एकदा सक्षम आरोग्य यंत्रणे संदर्भात पत्रव्यवहारा करुन हा विषय ऐरणीवर आणला आहे.

येथील रत्नागिरी गँस प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र रुग्णालय आहे. तसेच निरामय हे रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. आरजीपीपीएल, एनटीपीसी, केएलपीएल, गेल या कंपन्यांद्वारे सीएसआर फंडातून या रुग्णालयाची सुधारणा व स्वच्छता केल्यास उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण होईल. तसेच अंजनवेल येथे  युसूफ मेहेर अली सेंटरद्वारे चालविले जाणारे रुग्णालय इमारतीसह उपलब्ध आहे. 2 कि.मी.च्या परीघामध्ये वरील 3 रुग्णालये आहेत. ही रुग्णालये एकत्रीत केल्यास या आरोग्य यंत्रणांचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्याच्या कोवीड-19 अंतर्गत आरोग्य व्यवस्थेसाठी करता येईल. तरी या कामासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन डाँ. विनय नातू यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद प्रधान व सुरेश प्रभू यांना दिले आहे.

डॉ. नातूंची निवेदने मिळाल्यावर खासदार सुरेश प्रभुंनी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान यांना पत्र लिहिले. या पत्रात सुरेश प्रभु म्हणतात की, तीन रुग्णालयांचे एकत्रिकरण करुन कोविड 19 अंतर्गत आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी.

Tags: Dr Vinay natuGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNiramay HospitalRgpplSuresh Prabhuमराठी बातम्या
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.