गुहागर : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुहागर शहरातील कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून आरोग्य विभागाला सहकार्य केले.
As the incidence of corona in the district is not decreasing, as per the collector order, all the traders in Guhagar city cooperated with the health department by conducting RTPCR test to prevent corona infection in Guhagar city.
गुहागर आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील कोरोनाचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी कोरोना तापसणीवर जोर दिला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने सर्वच नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले आहेत. लोकांची वाढत्या गर्दीमुळे व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी 4 वा. गुहागर आगारमध्ये शहर परीसर मधील सर्व व्यापारी व त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद करून टेस्ट करून घेतली. जे व्यापारी टेस्ट करून घेतली त्यांनाच दुकाने उघडता येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.