• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी बाजारपेठ रस्ता प्रश्नी उद्या महत्त्वपूर्ण बैठक

by Ganesh Dhanawade
November 18, 2020
in Old News
16 0
0
शृंगारतळी बाजारपेठ रस्ता प्रश्नी उद्या महत्त्वपूर्ण बैठक
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती 

गुहागर : गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या नियोजित कामामुळे शृंगारतळी बाजारपेठ येथे होणाऱ्या  गैरसोयीबाबत शृंगारतळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी उदया, गुरूवार दि. १९ रोजी बैठक बोलाविली आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात दुपारी १२ वाजता ही बैठक होणार असून संबंधित खात्यांचे अधिकारी व ठेकेदार यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दि. ८ नोव्हेंबर रोजी आ. श्री. जाधव हे शिवसेनेच्या स्नेहमेळाव्यासाठी शृंगारतळी येथे आले होते. त्यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. अजित बेलवलकर आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेवून रस्ता रूंदीकरणाच्या नियोजित कामामुळे होणारी गैरसोय त्यांच्यापुढे कथन केली होती. रूंदीकरणाच्या कामात रस्त्याची उंची वाढून नुकसान होईल आणि यावर आपणच मार्ग काढू शकता, अशी भूमिका घेवून या प्रश्नी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासमवेत बैठक घेण्याची विनंती केली होती.
आ. श्री. जाधव यांनी दिवाळी होताच आपण ही बैठक घेवू असा शब्द त्यांना दिला होता. त्याप्रमाणे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागासह सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे.
आमदार श्री. जाधव यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर, विषेशतः कापसाळ, कामथे, खेरशेत,  लोटे, सावर्डे आदी ठिकाणी रस्त्याला अंडरपास मंजूर करून त्या त्या भागातील जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारच्या अखत्यारितील हे विषय असतानासुध्दा दिल्लीवरून अधिकारी बोलावून घेवून, त्यांना वस्तुस्थिती पटवून देवून त्यांना या कामांना मान्यता देण्यास भाग पाडले. त्यामुळे उदयाच्या बैठकीत शृंगारतळी बाजारपेठेतील रस्त्याचा प्रश्नदेखील ते आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावून सोडवतील,  असा विश्वास सर्वांना आहे.

Tags: Bhaskar JadhavChiplun RoadGuhagarGuhagar NewsGuhagar Vijapur National HighwayMarathi NewsMLA Bhaskar JadhavModkaagar BridgeNational HighwayNews in GuhagarVijapur Highwayगुहागर चिपळूण रोडगुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामुंबई गोवा महामार्गमोडकाआगरचा पुलराष्ट्रीय महामार्गलोकल न्युजविजापूर महामार्ग
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.