• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची तळवली गावाला भेट

by Ganesh Dhanawade
February 2, 2021
in Old News
16 1
0
जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांची   तळवली गावाला भेट
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तळवली मोठी बौद्धवाडी येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

गुहागर : जि. प.च्या समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी नुकतीच तळवली मोठी बौद्धवाडी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. येथील ग्रामस्थांचा पाण्याचा असलेला मुख्य प्रश्न गेले अनेक दिवस रेंगाळत होता. हा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले. 
गुहागर तालुक्यातील तळवली मोठी बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचा गेले अनेक वर्षे पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत.केवळ आश्वासनांपलीकडे ठोस कोणतेही काम न झाल्याने येथील महिला वर्गाच्या डोक्यावरील हंडा अद्याप उतरलेला नाही. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांची याबाबत असलेली अनास्था यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे हेलपाटे मारूनही येथील नळपाणी योजना अडकुन पडली आहे. अखेर येथील ग्रामस्थांची ही असलेली समस्या प्रत्यक्ष गावात वाडीवस्तीवर जात तेथील ग्रामस्थांची कैफियत ऐकून घेत हे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास त्यांनी यावेळी येथील उपस्थित महिलावर्ग व ग्रामस्थांना दिला.
यावेळी जि. प.समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांचे पती राजेश जाधव, माजी उपसरपंच राकेश पवार,तळवली ग्रा. पं. चे प्रशासक श्री धायगुडे, ग्रामसेवक श्री.बागुल तसेच सर्व गावपॅनलचे नवनिर्वाचित सदस्य आणि मोठी बौद्धवाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आपल्या वाडीत येऊन गेले अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांच्या व्यथा प्रत्यक्षात जाणून घेतल्यामुळे बौद्धवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarऋतुजा जाधवगावपॅनलगुहागर तालुका प्रशासनजि. प.समाजकल्याण सभापतीटॉप न्युजताज्या बातम्यानळपाणी योजनाप्रशासनमराठी बातम्यालोकप्रतिनिधीलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.